‘वृत्तपत्र’ हे लोकशिक्षणाचे व समाजाच्या हितासाठी झगडण्याचे साधन म्हणून ज्यांना पत्करावयाचे असेल, त्यांनी ‘व्रत’ पाळले पाहिजे…
वृत्तपत्राचा संपादक होऊ इच्छिणाऱ्यात चार गुण हवेत. पहिला, त्याच्याजवळ समाजाच्या सुखदुःखाची नेहमी कदर हवी. दुसरा, वाचन भरपूर पाहिजे. वाचन हे ज्ञानाचे साधन, ते सतत जागते ठेवणारा खरा व बहुश्रुत संपादक होऊ शकेल. तिसरा, या व्यवसायात अत्यंत कष्ट करण्याची तयारी हवी. चौथा, इंग्रजी चांगले यावयास हवे. त्याचे नित्य वाचन ठेवून संपादकाने जगाशी संबंध राखला पाहिजे. हे चार गुण संपादकाच्या यशाची मी चतुःसूत्री समजतो.......